धाराशिव  (प्रतिनिधी)-जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखालील नुकत्याच झालेल्या बैठकीत सन 2023 -24 च्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. 

जिल्हा क्रीडा पुरस्कार समितीमध्ये जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष डॉ.सचिन ओंबासे,जिल्हा क्रीडा पुरस्कार समितीचे सदस्य उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा लातूर विभाग लातूर, शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ.चंद्रजित जाधव,राजकुमार सोमवंशी,जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी प्रवीण बागल आणि जिल्हा क्ऱीडा अधिकारी तथा सचिव जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती श्रीकांत हरनाळे यांच्या समितीने पुरस्कार निश्चित केले.

जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण येत्या रविवारी 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमात होणार आहे.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांची उपस्थिती राहणार आहे. पुरस्काराचे स्वरुप जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह दहा हजार रुपये रोख रक्कम देवुन गौरविण्यात येणार आहे. सन 2023-24 चे जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी म्हणून रितेश जाधव यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (खो-खो), विजय शिंदे यांना गुणवंत खेळाडु (खो-खो)आणि संपदा मोरे यांना गुणवंत खेळाडु (महिला),(खो-खो) म्हणून निवड करण्यात आली आहे.


 
Top