भूम (प्रतिनिधी)- विद्या विकास मंडळ पाथरूड संचलित शंकरराव पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये आयोजित अविष्कार स्नेहसंमेलनाचे आयोजन दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले होते. यावेळी मनोरंजनात्मक खेळ व विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये नृत्य सामाजिक नाटके देशभक्तीपर गीत समुहनृत्य नाटिका लावणी शायरी अशा विविध कला गुणांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या स्नेहसंमेलनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्या विकास मंडळाचे सहसचिव प्रा. संतोष शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांनी वक्तृत्व निबंध विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम आदी मध्ये सहभाग घ्यावा. यामुळे अभ्यासासह विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी मदत होईल. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मिस्टर एसपी कॉलेज म्हणून सोमेश्वर पवार तर मिस एसपी कॉलेज म्हणून रिया कांबळे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेची उपाध्यक्ष प्राध्यापक डी. डी. बोराडे तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंदनशिव एस. बी., उपप्राचार्य डॉ डि.व्ही. शिंदे, प्रा. तानाजी बोराडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. इनामदार जी. एस., प्रा गंगाधर काळे, प्रा व्यंकटेश माने यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोहन राठोड, प्रा. धनश्री पिंपरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभागाच्या प्राध्यापिका डॉ. अलगुंडे शीतल यांनी मानले.