भूम (प्रतिनिधी)-  देशाला स्वातंत्र्य मिळालं , स्वातंत्र्याचा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरामध्ये कानाकोपऱ्यात अगदी दिवाळी सारखा साजरा केला गेला आणि ठिकठिकाणी विविध कार्यक्रम झाले. यामध्ये भूम शहरातील श्री चौंडेश्वरी ट्रस्ट पदाधिकारी समाज बांधवांनी मात्र प्रबोधनाची वारी शेतकऱ्याच्या बांधावरील अशा या ब्रीद वाक्याला अनुसरून बांधावर बळीराजाचं प्रबोधन करत तेथेच भोजनाचा आनंद घेत प्रजासत्ताक दिनाचाही आनंद साजरा केला. 

रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले, भूम येथील उपविभागीय महसूल कार्यालयाच्या प्रांगणात सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक, धार्मिक, सर्व क्षेत्रातील पदाधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी, सर्वांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी संविधानाचा जयजयकार केला. विविध कार्यक्रमाच सादरीकरण केले. सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने श्री चौंडेश्वरी देवांग समाज ट्रस्ट पदाधिकारी समाज बांधवांनी महेश बागडे  यांच्या शेतात जाऊन राष्ट्रीय उत्सव साजरा केला.  दरम्यान वनभोजनही घेतले. यावेळी ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल बागडे, नवनाथ रोकडे, ज्ञानेश्वर असलकर, प्रकाश बागडे, ज्ञानेश्वर टकले, राम बाबर, दिगंबर भसाकरे, संतोष गुरसाळे, शंकर म्हैत्रे, संजय बागडे, जय बाबर, शाम बागडे आदींची उपस्थिती होती.

 
Top