धाराशिव (प्रतिनिधी)- पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज 25 जानेवारी रोजी जिल्हयात आगमन होताच तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनक घोष व पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री सरनाईक यांनी दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या जिर्णोद्धारासह मंदिर परिसरात सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामांची पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी सुरू असलेल्या कामाची माहिती पालकमंत्र्यांना यावेळी दिली. पालकमंत्री सरनाईक यांचे जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी कवळ्याची माळ घालून व श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा व देवींजींची साडी भेट देऊन स्वागत केले.