धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता समूहाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड यांना ग्रामीण भागात उद्योग, कृषि, दुग्धव्यवसाय, बँकिंग, शैक्षणिक, विधी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल नाशिक येथे रिसील डॉट इन व समाचार वाणी यांच्यातर्फे “महाराष्ट्राचा अभिमान, उद्योगांचा सन्मान-महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार २०२५” या पुरस्काराने सन्मानित केले.
नाशिक येथे पार पाडलेल्या कार्यक्रमास मा.संजय हजारी चीफ जनरल मॅनेजर अमिनेशन फॅक्टरी खडकी, पुणे, प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित, मा.अभय दफ्तरदार असिस्टंट डायरेक्टर एमएसएमई, मा.सतीश कल्याणकर,एमडी वेदांत इन्फोटेक, मा.अमलेश त्रिपाठी झोनल मॅनेजर युको बँक, डॉ. चेतन सिंग राजपूत असिस्टंट कमिशनर जीएसटी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र इत्यादि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मराठी फिल्म अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्या हस्ते हा पुरस्कार गुंड यांनी स्वीकारला या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातील विविध उद्योजक उपस्थित होते.
आपल्या दूरदर्शीपणाने रुपामाता उद्योग समूहाला उच्चपूर्ण महाराष्ट्रभर पोचवणारे अॅड. व्यंकटराव गुंड यांच्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. रूपामाता उद्योगसमूहाने धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यात उद्योगीक, कृषी, औद्योगिक, बँकिंग, दुग्धव्यवसायाद्वारे शेतकर्यांना उत्पन्नाचे विविध मार्ग उपलब्ध करून दिले असून, युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. या पुरस्कारामुळे अधिकाधिक उद्योजकांना प्रेरणा मिळणार असून, जिल्हयातील उद्योगांना नवी ओळख मिळणार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गुंड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार स्वीकारताना मला मनस्वी आनंद होत आहे. हा पुरस्कार म्हणजे संपूर्ण रुपामाता परिवार, शेतकरी, बँकेचे खातेदार, माझे हितचिंतक, उद्योजक, सहकारी मित्र परिवार यांचा गौरव आहे व या सर्वांचा कायम ऋणि आहे.