कळंब (प्रतिनिधी)-येथील बस आगारात हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती बस स्थानकाची स्वच्छता करून उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील बस स्थानकात हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून बस स्थानक परिसर स्वच्छ करण्यात आला. याप्रसंगी कळंब आगाराचे व्यवस्थापक एस.डी .खताळ वाहतूक निरीक्षक निलेश जाधव, सहाय्यक वाहतूकनिरीक्षक अभिजीत धाकतोडे, अधीक्षक कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती, विलास जाधव, वाहतूक नियंत्रक नाना नानजकर, वाहक चालक डी. एम. मुंडे, शिवाजी बांगर गोविंद जाधवर, चेतन गोसावी, बाबासाहेब धावारे, ठेकेदार टेकाळे आदी उपस्थित होते.