तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील आपसिंगा येथील गटनंबर 408 मधील ग्रामपंचायत देखरेख जागेतील मुरुम अवै रित्या उचलला जात आहे. याची तात्काळ दखल महसुलने घेऊन याची चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी. अशी मागणी ग्रामवासियांमधुन केली जात आहे. विशेष म्हणजे या जागेची शासकीय मोजणी झाल्याचे समजते.

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरापासुन अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आपसिंगा गाव पाणी टाकीजवळ येथील गटनंबर 408 मधील मुरुम टँक्टर, जेसीबी  लावुन उचलला जात आहे. सदरील मुरुम काढण्याचा परवाना आहे का असल्यास गौणखनिज प्रकरणी किती पैसे भरले व किती ब्राँस मुरुम काढण्याचा परवाना आहे. याची चौकशी करुन दोषी अंती संबधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आपसिंगा गाव खोलगट भागात असल्याने येथे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ये-जा कमी असतात. याचाच लाभ अवैध उत्खनन करणारी मंडळी घेत आहे. यापुर्वी येथील अवैध उत्खनन प्रकरणी कोट्यावधी रुपयाचा दंड भरला न गेल्यामुळे ही जमिन शासनाने ताब्यात घेतली असल्याचे समजते. अवैध उत्खनन प्रकरणी ऐवढी मोठी घटना घडून ही पुनश्च अवैध उत्खनन करणारे माफीया सक्रिय झाल्याने या भागातील नैसर्गिक संपत्तीचे उत्खनन करुन -हास केली जात असल्याने याची महसुल विभागाने दखल घेऊन संबधित उत्खनन माफीयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 
Top