तुळजापूर (प्रतिनिधी)-  पूर्व पाकिस्तानातील बांगलादेश निर्मीत करण्यासाठी  बांगलादेश मधील कोपल्ला  येथे 1971 लढाईत सेवन मराठा इंन्फ्ट्रि बटालियनचे  शहीद झालेले तुळजापूरचे शहीद विजयसिंह आनंदराव कुतवळ यांना  बांग्लादेशकडुन पुरस्कार जाहीर झाला. तो पुरस्कार कै. शहीद विजयसिंह कुतवळ यांचे बंधु माधवराव कुतवळ यांनी मराठा रेजमेंट इंन्फ्ट्रिंचे नायक गिते यांनी तुळजापूर येथे येवुन दिला. यात चांदीचे पदक व राष्ट्रपती पंतप्रधान कडुन प्रमाणपञ अशा स्वरुपात दिले.

1971 मध्ये झालेल्या बांग्लादेशमुक्ती भारत पाकिस्तान युद्धामध्ये सवेन मराठा इंन्फट्रीचे बटालियन बांगला देशातील कोपल्ला येथे जावुन ही लढाई 13 ते 16 डिसेंबर 1971 रोजी झाली. येथे तुळजापूरचे सुपुत्र शहीद कै. विजयसिंह आनंदराव कुतवळ गोळीबारात जखमी झाले. नंतर त्यांना विमानाने दिल्लीत आणले असता उपचार चालु असताना ते शहीद झाले. याबद्दल त्यांना बांगलादेश व भारत सरकारने पुरस्कार जाहीर केले होते. कोवीडमुळे ते रखडले. नंतर युध्द सुरु झाले. अखेर बांगलादेश सरकारने ते वितरत करण्यासाठी भारताकडे दिले व ते पुरस्कार दि.3 जानेवारी रोजी बेळगाव येथील मराठा रेजिमेंटचे नायक गिते यांनी हा पुरस्कार शहीद कै. विजयसिंह आनंदराव कुतवळ यांचे लहान बंधु माधवराव कुतवळ यांच्याकडे देण्यात आला. यावेळी अभिजीत माधवराव कुतवळ उपस्थित होते. यावेळी गिते यांच्याकडे महाराष्ट्रातील पाच जवानांचे पुरस्कार देण्यात आले होते ते त्यांनी वितरीत केले.


 
Top