तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील नळदुर्ग रस्त्यावर असणाऱ्या कचरा डेपो ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या बालाघाट डोंगरापट्याला अचानक आग लागली. नगर परिषद अग्नीशमन दलाची गाडी येवुन तात्काळ विझवल्याने यात वनसंपदा वाचुन पालापाचोळा झळुन खाक झाला व पुढील अनर्थ टळला. यात  जिवीत हानी व नुकसान झाले नाही.

सदरील आग  शनिवार दि. 5 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता लागली. सव्वातीन वाजता अग्निशमन दलाचे वाहन येवुन त्यांनी आग विझवल्याने आग बालाघाट डोंगर भागात पसरली नाही. सदरील आग कशाने लागले याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. कचराडेपो पासुन आग लागताच ती आग वेगाने डोंगरावर पसरु लागले. यात वनचर  प्राणी निघुन गेल्यामुळे ते बचावले गेले. वाळलेला पाला पाचोळा माञ जळुन खाक झाला. या पुर्वी ही या डोंगर कडा भागाला आग लागली होती. उष्ण वातावरण नसल्याने आग वृक्षला लागू शकली नाही. यात लावलेले वृक्ष वाचले.


 
Top