धाराशिव (प्रतिनिधी)-रुपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाडोळी आ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी. आज शुक्रवार दि. 03.01.2025 रोजी  क्रांतीज्योती, ज्ञानज्योती, सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या व मुलींच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमे चे पूजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सावित्रीबाई फुले वेशभूषा, गीत गायन, एकपात्री नाटिका, नृत्य  सादर करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या मनोगता मध्येसावित्रीबाई फुले यांचे जीवन स्त्रीशिक्षण, सामाजिक समता, सावित्रीबाईंच्या कार्याचा आदर्श घेऊन महिलांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी आधुनिक उपक्रम राबवण्याची गरज आहे असे बहुमूल्य मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.  शाळेचे मुख्याध्यापक सुरेश मनसुळे, सचिन यादव, बापू शेख, सचिन सोनकठलेसर, निमेश गावित, रवी पवार, दिलीप ठाकूर, दयानंद थोरात, विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top