धाराशिव (प्रतिनिधी)- टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यात व बार्शी तालुका परिसरात आलेला वाघ तीन आठवड्यापासून पशुपालकांच्या गायी, वासरांचा फडशा पाडत आहे. त्यामुळे या वाघाला पडण्याचे आदेश वनविभागाला दिले आहेत. 

विदर्भातील दिपेश्वर अभयारण्यातून एक वाघाचा बछडा रामलिंग अभयारण्यात पोहोचला होता. रामलिंग व बार्शी तालुक्यातील काही गाव परिसरातील पशुपालकांच्या गायी, वासरांवर वाघ हल्ला करून फडशा पाडत आहे. तीन आठवड्याच्या कालावधीत बार्शी व धाराशिव तालुक्यातील 16 जनावरांची शिकार वाघाने केली. वाघाच्या उच्छादामुळे पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वाघाला पकडण्याची मागणी शेतकरी, पशुपालकांकडून होत आहे. मुख्य वनसंरक्षकांना वाघ पकडण्याची परवानगी दिली आहे. वाघ पकडण्यासाठी चंद्रपुर येथील दहा जणांचे पथक धाराशिव येथे सोमवारी दाखल होणार आहे. पथक आल्यानंतर वाघाचे लोकेशन पाहून पिंजरा लावून पकडले जाणार आहे. दरम्यान, रविवारी वनविभागाच्या पथकाने वनक्षेत्रात पाहणी केली आहे. 

 
Top