तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञ उत्सवातील पौष पोर्णिमे दिनी सोमवार दि. 13 जानेवारी रोजी दुपारी मंदीरातील घटोत्थापन करण्यात येवुन शाकंभरी नवरात्र उत्सवाचा सांगता झाला.
सोमवारी पहाटे एक वाजता चरणतिर्थ होवुन धर्मदर्शनानास आरंभ झाला. नंतर सकाळी सहा वाजत देविजीस भाविकांचे अभिषेक करण्यात आले. ते दहा वाजता संपल्यानंतर देविमुर्ती स्वच्छ करण्यात आल्यानंतर वस्ञोलंकार घालण्यात आले. दुपारी यज्ञकुंडात पुर्णाहुती दिल्यानंतर शाकंभरी देवि समोरील घट उटवले (घटोत्थापन) केले. राञी मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आल्यानंतर महंत वाकोजी बुवांनी प्रक्षाळ पुजा केल्यानंतर जोगवा विधी संपन्न झाल्यानंतर शाकंभरी नवराञ उत्सव विधीचा सांगता झाला.