धाराशिव (प्रतिनिधी)- दिवसा घरफोड्या करणारा, महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक जिल्ह्यातील पोलिसांना आव्हान देणारा अट्टल चोर अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला कळंबमधून अटक करण्यात आली आहे.
गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अधिकारी व कर्मचारी चोरीच्या मालातील गुन्हे उघडकीस आणण्याकरिता दृष्टीने काम सुरु केले. यावेळी पथकास गुप्त बातमीदार मार्फत समजले की, धाराशिव येथील आनंदनगर पोलिस ठाणे हद्दीत दिवसा घरफोडीतील संशयित रामजाने क्षिरसागर हा व त्याचा एक साथीदार कळंबमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबल्याची माहिती मिळाली. पथकास तेथे दोघे एका दुचाकीसह सापडले. त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नावे विचारता त्यांनी त्यांची नावे रामजाने उर्फ राम लक्ष्मण क्षिरसागर, वय 31 वर्षे, रा. वाघोली ता. कळंब जि. धाराशिव, धनंजय उर्फ डीके हरिष काळे, वय 20 वर्षे, रा. गणपती मंदीर शेजारी, काटे चाळ कासारवाडी, पिंप्री चिंचवड पुणे असे सांगीतले. चौकशी केली असता तीन-चार दिवसापूर्वी धाराशिवमध्ये तीन ठिकाणी, वाशी भागात दोन ठिकाणी, तामलवाडी, नळदुर्ग भागात एक ठिकाणी व लातुर येथे एका ठिकाणी बंद घरांमध्ये दिवसा चोऱ्या केल्याचे सांगितले. पथकाने त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख, दुचाकी असा एकूण 3 लाख 18 हजार 300 रूपयांचा माल हस्तगत केला. आरोपींनी आतापर्यंत कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील सोलापुर, कोल्हापुर, पुणे, कोकण परीसरात अनेक दिवसा घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हा शाखेचे सपोनि सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण,जावेद काझी, चालक तानाजी शिंदे यांच्या पथकाने केली आहे.