परंडा (प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाच्या व्यक्ती पैकी सावित्रीबाई फुले या एक आहेत. त्यांनी जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी काम केले. असे प्रतिपादन माजी प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी केले.
श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले युवती मंचाच्या वतीने आयोजित केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने ,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, युवती मंचच्या समन्वयक प्रा शेख ए.एम.तसेच सदस्या प्रा. कीर्ती नलवडे, प्रा.प्रतिभा माने, प्रा. पी.जी.मोरवे, प्रा. ए. ए. खारे, प्रा. एस.एन.सातव, पल्लवी देशमुख प्रा. रिया परदेशी प्रा.स्नेहल कोकाटे आदी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी साडी परिधान करून साडी डे साजरा केला. अध्यक्ष समारोप करताना प्राचार्य डॉ.सुनील जाधव म्हणाले की, या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञानाच्या आधारे आपली ओळख निर्माण करावी. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. महाविद्यालय सर्व सोयींनी परिपूर्ण असून त्याचा जास्तीत जास्त फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा माने यांनी केल. प्रास्ताविक प्रा. ए.एम.शेख यांनी केले. तर प्रा.परविन मोरे यांनी आभार मानल.े शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.