तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूरातील स्वछता न केल्यास व अतिक्रमणे येत्या आठ दिवसात न हटविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाविकास आघाडीने मुख्याध्याकारी यांना निवेदन देवुन दिला.
तिर्थक्षेञ तुळजापूर मध्ये घाणीचे साम्राज्य झाले आहे. तसेच तुळजापूर मधील ड्रेनेज तुडुंब भरून वाहु लागले आहेत. यामुळे भाविक, नागरिक यांच्या आरोग्य सुरक्षा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच तुळजापूर शहरातील मोक्याच्या नगर परीषद जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले आहेत. या अतिक्रमणातुन कोट्यावधी रुपयाची उलाढाल होवुन नगर परीषद उत्पन्नापासुन वंचित राहत असल्याने हे अतिक्रमणे तात्काळ हटवावीत अन्यथा महाविकास आघाडी तुळजापूर यांच्या वतिने आंदोलन करण्यात येवुन निर्माण होणाऱ्या परिस्थितीस नगर परीषद जबाबदार राहील असा गंभीर इशारा दिला आहे. यावेळेस अमर मगर, अमोल कुतवळ, श्याम पवार, राहुल खपले, नवनाथ जगताप, शरद जगदाळे, आनंद जगताप, सुदर्शन वाघमारे, रणजीत इंगळे, श्रीकांत धुमाळ, अक्षय परमेश्वर, सुधीर कदम, भरत जाधव, आकाश शिंदे, ओंकार हरणारे, तौफिक शेख, बापूसाहेब नाईकवाडी उपस्थित होते.