तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील भाजप कार्यकर्ते गुलचंद व्यवहारे यांना अभिनेते अभिताब बच्चन होस्ट करीत असलेल्या कोन बनेगा करोडपती या कार्यक्रमात  व्हिआयपी गेस्ट जाण्याचे भाग्य  लाभले.

या भेटी बद्दल बोलताना म्हणाले कि, भारतीय सिनेसृष्टीचे शहेनशहा, अमिताभ बच्चन यांना भेटणे हे केवळ एक स्वप्न होते पण ते  स्वप्न  प्रत्यक्षात उतरल्याचे सांगितले. कोण बनेगा करोडपतीच्या शोच्या निमित्ताने मला त्यांनी व्हीआयपी गेस्ट म्हणून मला त्यांना निमंत्रित केले होते. भेटायला गेल्यानंतर काही क्षण त्यांच्याबरोबर संवाद साधता आला. साधारण पाच ते साडेपाच तास त्यांचा अविस्मरणीय क्षण अनुभवता वयाच्या 84  व्या प्रचंड ऊर्जाशील कर्तुत्ववान व्यक्तीला पाहणे व संवाद साधण्याचे भाग्य मला लाभल्याचे शेवटी म्हणाले.


 
Top