धाराशिव (प्रतिनिधी)-मागील कित्येक वर्षापासून दिव्यांग क्षेत्रामध्ये संघटनेच्या माध्यमातून अविरत कार्य करणारे तथा दिव्यांगासाठी अहोरात्र झटणारे प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी आज पर्यंत केलेल्या कार्याची कामाची पावती म्हणून बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने प्रहार दिव्यांग संघटनेच्या मराठवाडा विभाग प्रमुखपदी मयूर काकडे यांची निवड करण्यात आली आहे.
धाराशिव ,लातूर ,बीड आणि जालना चार जिल्ह्याची जबाबदारी मराठवाडा प्रमुख म्हणून मयूर काकडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे. यावेळी मयूर काकडे यांनी आजपर्यंत सहकार्य केलेल्या सर्व पदाधिकारी व मार्गदर्शक मान्यवर यांचे मनापासून आभार मानले. यावेळी बच्चू भाऊ यांनी केलेले आजवरचे मार्गदर्शन व माझ्यासारख्या दिव्यांग व्यक्तीला समाजात एक स्वतंत्र स्थान प्राप्त करून दिल्याबद्दल व त्यांच्या विचाराने आजपर्यंत केलेल्या कार्याची ही आज मिळाली पावती असून ,संघटनेतील आज पर्यंतचे सर्व सहकारी जे प्रत्येक परिस्थितीत माझ्यासोबत ठाम राहून मोलाची साथ दिली. तसेच मित्रपरिवार व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य व मार्गदर्शन करणाऱ्या व माझ्याबाबतीत शुभ भावना ठेवणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार त्यांच्या भाषणातून मांडले.
यावेळी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्यासह राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव, राज्य संपर्कप्रमुख रामदास खोत, सुरेश जी मोकाल ,शिवाजी गाडे, देवदत्त माने, सविताताई जाधव, सुजाता ताई पवार, दत्तात्रय भोसले, चंद्रकांत मोहळ, हनुमंतराव झोटिंग, संजीवनीताई बारंगुळे, लक्ष्मीताई देशमुख नितीन देशमुख,सुरेखा ढवळे, कविता पवार यांच्यासह सर्व राज्य कार्यकारणी व राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आभार यांच्या वतीने मानण्यात आले.