धाराशिव (प्रतिनिधी) - मांजरा शुगरचे मार्गदर्शक सहकार महर्षी व महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तुळजापुर तालुक्यातील मंगरुळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज कारखान्याचा गाळप हंगाम सन 2024-25 यशस्वीपणे चालु असुन, दि. 02 जानेवारी 2025 अखेर कारखान्याचे गाळप 1,32,340 मेट्रीक टन इतके झाले आहे. कारखान्याने दि.16 डिसेंबर ते 31 डिसेंबर-2024 या कालावधीत गाळपास आलेल्या ऊस बिलाचे पेमेंट एफआरपी पोटी प्रती मेट्रीक टन रु. 2,700/- प्रमाणे आज (दि. 04) रोजी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेली आहे.
धाराशिव व परिसरातील शेतकऱ्यांना यापुर्वी आपला ऊस गाळपास देण्यासाठी अनंत अडचणींचा सामाना करावा लागयाचा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल करत अल्पावधीतच मांजरा शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळपास आणुन व ऊस बिलाची रक्कम वेळेत अदा करुन त्यांचा विश्वास संपादन केला आहे. ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याचा महत्वाचा घटक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थक्रांती आणणे व त्यांचे जीवनमान उंचावण्याचा सार्थ हेतुने मांजरा शुगर इंडस्ट्रीज कारखान्याची त्या दिशेने वाटचाल सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणुन कार्यक्षेत्र व परिसरात कारखान्यामार्फत विविध ऊस विकास योजना राबविण्यात येत असुन त्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मांजरा कारखान्याची शेतकऱ्यांना वेळेवर ऊस दर अदा करण्याची पंरपरा कायम ठेवत या कारखान्याने दि.16 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति मेट्रीक टन रु.2,700/- प्रमाणे ऊस बिलाची रक्कम बँकेत वर्ग करीत आहेत.
मांजरा शुगर इंडस्ट्रीज विषयी शेतकऱ्यांची असलेली विश्वार्हता यामुळेच कार्यक्षेत्र व भागातील ऊस उत्पादक शेतकरी मांजरा कारखान्यास ऊस पुरवठा करण्यासाठी उत्स्फुद प्रतिसाद देत आहेत. कारखाना व्यवस्थापनाने भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्याचे नियोजन केले असुन शेतकऱ्यांनी त्यांचे ऊसाची अन्य विल्हेवाट न करता मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) कारखान्यास जास्तीत जास्त ऊस पुरवठा करुन सहकार्य करण्याचे आवाहन कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री. सतीश वाकडे यांनी केले.