धाराशिव (प्रतिनिधी) - व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी हुंकार बनसोडे यांची पुन्हा बिनविरोध ऑनलाईन पध्दतीने राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांच्या उपस्थितीत दि.२१ जानेवारी रोजी निवड करण्यात आली.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात नूतन निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस व्हॉईस ऑफ मीडियाचे महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, उपाध्यक्ष प्रकाश काशीद, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष जुबेर शेख, जिल्हा कार्यवाहक कुंदन शिंदे, प्रसिद्धीप्रमुख सलीम पठाण, जिल्हा कार्यकारणी सदस्य आकाश नरोटे, एज्युकेशन विंगचे किरण कांबळे, असिफ शेख, जिल्हा संघटक किशोर माळी, अहमद अन्सारी, जुबेर शहा आदी तर ऑनलाईन पद्धतीने जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत मडके, गोविंद खुरुद, जिल्हा उपाध्यक्ष संतोष वीर, सहसरचिटणीस अजित चंदनशिवे, जिल्हा कोषाध्यक्ष रवींद्र लोमटे, जिल्हा उपाध्यक्ष गो.ल. कांबळे आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.