भूम (प्रतिनिधी)-विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने आज शिवसेना, युवासेना, महिलासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भारतीय संविधान उद्देशीका प्रतीचे पूजन तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, गायकवाड आबा यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपाचे अमित शहा आणि काही नेते संवीधान बदलण्याची भाषा करत आहेत. त्या क्रूर प्रवृत्तीच्या नेत्यांचा व त्यांच्या पक्षाचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला.
आणी भारतीय संविधानाचा जयजयकार करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख डॉ चेतन बोराडे, समन्वयक दिलीप शाळू महाराज,दलीत पँथर सेनेचे चंद्रमनी गायकवाड, आबासाहेब मस्कर,महिलासेना तालुका संघटक उमाताई रणदिवे,लांडे ताई,गपाट ताई, सुधीर ढगे, युवासेना तालुकाप्रमुख, सुनिल गपाट, श्रीमंत भडके,विनोद रेडे, शर्फराज कुरेशी,औदुंबर वारे, श्रीकांत केदारी,मनोज पेंटर,दत्तात्रय बोंबले,जयराम शेंडगे, अनिल मुळूक, बाबूराव सपकाळ,अंगद जगदाळे,सातपूते,दादा कदम, नवनाथ निकम, सदा टकले, दिक्षीत काका, मुकेश पाटूळे, पिराजी शेळके, अमोल पंडीत, विठ्ठल गुंजाळ,मुकुंद लगाडे, रणखांब व शिवसेना युवासेना महिलासेना शाखाप्रमुख शिवसैनिक उपस्थित होते.