तुळजापुर (प्रतिनिधी)-कृषि विभागाच्या वतीने दि 17 ते 19 जानेवारी तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथे जिल्हा स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील 8 तालुके व इतर कार्यालयीन संघ असे एकूण 12 संघ पुरुष व 4 महिला संघ सहभागी झाले होते. यात तालुका कृषि अधिकारी तुळजापूर महेश देवकाते यांच्या नेतृत्वात सर्व अधिकारी कृषि पर्यवेक्षक कृषि सहाय्य्क यांच्यासह इतर टीमने पथसंचलन प्रकारात बाराबलुतेदार थीमने प्रथम क्रमांक मिळवून तुळजापूर तालुक्याने पथसंचलन मध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याची हॅट्रिक साधली.
सांस्कृतिक कार्यक्रमात नवदुर्गा आरती सादर करून उपस्तिथची मने जिंकली व यातही प्रथम क्रमांक मिळविला.
40 वर्ष पेक्षा कमी वयोगट मध्ये महिला तसेच पुरुष यांनी 100 मी, 200 मी, 400 मीधावणे व 400 मी रिले यांनीही गुण मिळवून तुळजापूर तालुक्याचे गुणांकन वाढत राहिला. यातच भर म्हणून महिला कब्बडी हॉलीबॉल यामधे विजेतेपद तर क्रिकेट मध्ये उपविजेतेपद मिळविले.तसेच सूर्यनमस्कार प्रकारात एकूण सहभागी स्पर्धकांपैकी 13 जणांनी तब्बल 251 सूर्यनमस्कार काढले शेवटी वेळे अभावी सर्वच सहभागी स्पर्धकांना विजयी घोषित करण्यात आले. यात 13 पैकी तुळजापूर तालुक्यातील 4 स्पर्धक अग्रभागी होते. सर्व कला, क्रीडा प्रकारात यश खेचून आणल्यामुळे 111 गुणांसह सर्वसाधारण विजेते पदाचा तुळजापूर तालुका मानकरी ठरला याबद्धल कृषि विभाग तुळजापूरच्या टीमचा जिल्हा भरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी धाराशिव रविंद्र माने व उपविभागीय कृषि अधिकारी धाराशिव श्री महादेव असलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते व यांच्या नियमित मार्गदर्शनामुळेच तालुका कृषि अधिकारी तुळजापूर संघ 2025 कृषि तरंगचा प्रथम क्रमांकाचा मानकरी होऊन जनरल चॅम्पिअनशिप विजेता ठरला.