धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील कलाविष्कार अकादमी द्वारा हौशी छंदी गायकांचा समुह यांच्या 10 वर्ष पूर्ती निमित्ताने प्रती वर्षी प्रमाणे ' साल नया गीत पुराने' अविट गीतांची बेधुंद मैफिल मेघ मल्हार सभागृहात संपन्न झाली. प्रथम संगीत तज्ञ आनंद समुद्रे , हभप पांडुरंग लोमटे महाराज , उद्योजक सुरेंद्र मालशेटवार, औषधी संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय आनंदे ,जेष्ठ कवी राजेंद्र अत्रे मेलडी स्टार्सचे संस्थापक अध्यक्ष युवराज नळे , समन्वयक रवींद्र कुलकर्णी माजी कृषी अधिकारी महारुद्र मोरे, जयश्री नलवडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले . त्यानंतर गायक भीमसेन जोशी यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली . युवराज नळे यांनी दशकपूर्ती प्रास्ताविकात या समूहाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील हौशी मंडळींना आपली गायन कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देता आले याचे समाधान आहे असे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शरद वडगाकर , मल्हारी माने , विधिज्ञ दिपक पाटील मेंढेकर, श्यामसुंदर भन्साळी , अनिल मालखरे, धनंजय कुलकर्णी ,कु. क्षितीजा निंबाळकर , तौफिक शेख , नितीन बनसोडे, अतुल कुलकर्णी ,सुजीत अंबुरे, सुर्यकांत कारंडे,सौ.वर्षा नळे ,सौ. सविता भोसले ,सौ. तारा मोरे , सुनिता माने , सुलक्षणा टिळक, विधिज्ञ विद्युलता दलभंजन , स्वरुपा पोतदार, अक्षय भन्साळी, महेश उंबर्गीकर , मुनीर शेख , मारुती लोंढे यांनी गायनातून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले . मैफिलीच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते सहभागी गायकांना प्रमाणपत्र , स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच बार्शीचे सुनील फल्ले यांचा ही 10 हजार गीतांचे गायन केल्याबद्दल सन्मानचिन्ह बुके देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर नुतन समन्वयक म्हणून शरद वडगावकर व सहसमन्वयक म्हणून मल्हारी माने यांचे पदग्रहण करण्यात आले व मैफिलीची सांगता 'चलते चलते हमारे गीत याद रखना' या सामुहिक गीताने यांनी झाली. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन प्रभाकर चोराखळीकर यांनी केले तर आभार रवींद्र कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेषनाथ वाघ, रविंद्र कुलकर्णी, शरद वडगावकर, तौफिक शेख, मल्हारी माने, राजाभाऊ कारंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास अनेक संगीतप्रेमींनी शेवटपर्यंत मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.