धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची वाणिज्य विभागातील विद्यार्थिनी स्वप्नाली मगर हिने 2024 मध्ये घेण्यात आलेल्या विद्यापीठाच्या परीक्षेत विद्यापीठात प्रथम येत सुवर्णपदक पटकावले आहे.
यापूर्वी देखील स्वप्नाली मगर ने बीकॉम भाग तीन च्या विद्यापीठाच्या परीक्षेत सुवर्णपदक पटकावले होते. स्वप्नाली मगर या विद्यार्थिनीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख,प्रा. बालाजी नगरे, डॉ. अवधूत नवले, डॉ.अमर निंबाळकर, प्रा. सुप्रिया शेटे यांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी स्वप्नाली मगर आणि वाणिज्य विभागातील सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.