धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मराठवाडा विभागीय गुणवंत विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मराठवाडा विभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख हे होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले की, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होते.
यावेळी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक बी एस सूर्यवंशी,प्रा. क्षीरसागर, डॉ. मच्छिंद्र नांगरे, संतोष साळुंखे, किशोर जाधवर, प्रा. क्रांती कदम आदींसह विविध संस्कार केंद्रातून गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मेळाव्याचे प्रस्ताविक प्रा.एस ए शेख यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वैभव आगळे यांनी केले. तर आभार प्रा.अतुल देशमुख यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.