तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात  क्यूआर कोड शिवाय कोणतीही जाहिरात दिसल्यास संबंधित व्यक्ती व कंत्राटदार यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केला जाईल. असा इशारा मुख्याधिकारी लक्षमण कुंभार यांनी दिला. जनहित याचिका क्र.155/2011 मधील आदेशानुसार शहरातील डिजिटल, पोस्टर, बॅनर यावर कारवाई करणे बाबत बैठक मंगळवार दि. 7 जानेवारी रोजी आयोजित केली होती. त्यात ते बोलत होते.

प्रथमता बैठकीमध्ये उपस्थितांना मार्गदर्शक सूचना व नियमावली वाचून दाखवली.  शहराच्या विविध भागांमधे बॅनर, फ्लेक्स लावायचे आहे ते ठिकाणी निश्चित करून देऊन, त्याबाबतची माहिती दिली. या शिवाय ज्या ठिकाणी अशा प्रकारचे फ्लेक्स डिजिटल बॅनर इत्यादी लावता येणार नाहीत अशा ठिकाणांची यादी सुद्धा उपस्थितांना वाचून दाखवली. अशा प्रकारच्या अस्ताव्यस्त व अनाधिकृत फ्लेक्स, डिजिटल बॅनर मुळं शहराच्या विद्रुपीकरणात वाढ होते. तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यामुळे अपघात होऊन दुर्घटनाही झाल्या आहेत.  यात मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झालेली आहे.  तुळजापूर हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे पवित्र तिर्थक्षेत्र असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर भाविक -भक्त दर्शनासाठी येतात. अशा प्रकारे केलेल्या जाहिरातीमुळे भक्तामध्ये नाराजीचा सूर दिसतो.  आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्व नागरीक, राजकीय पक्ष, संघटना यांनी सहकार्य करुन त्यांचा सहभाग वाढला पाहिजे असेही मुख्याधिकारी यांनी बैठकीत सांगितले. 

क्यूआर कोड शिवाय कोणतीही जाहिरात दिसल्यास संबंधित व्यक्ती व कंत्राटदार यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केला जाईल. बैठकीमध्ये व्यावसायिक व पत्रकार उपस्थित होते.  तर राजकीय पक्ष व संघटना यांना निमंत्रित केलेले असताना सुद्धा, कोणीही या बैठकीस उपस्थित नव्हते.  शेवटी मुख्याधिकारी यांनी जनहित याचिका क्र.155/2011मधील मार्गदर्शक तत्त्वावर नुसार उचित कार्यवाही करून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन नागरिकांना केले आहे.


 
Top