धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या विकास कार्याचा भाग व्हा. असे मुरूम शहरातील माधवराव पाटील महाविद्यालय येथे भारतीय जनता पार्टी सदस्यता नोंदणी कॅम्प मध्ये बोलताना  युवा नेते भाजपा शरण बसवराज पाटील म्हणाले. 

भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात सुरू असलेल्या “सदस्यता नोंदणी अभियान“ ला उमरगा-लोहारा मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपा सदस्य अभियानात सहभागी होण्यासाठी युवा नेते शरण पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले. आपल्या देशाला 2047 पर्यंत महासत्ता बनविण्याचा संकल्प नरेंद्र मोदी यांनी केला असून, या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आणि या महान कार्यात योगदान देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. भारतीय जनता पार्टीच्या या सदस्यता अभियानात सहभाग घेतल्यामुळे, आपले राष्ट्र आणखी मजबूत होईल आणि एक समृद्ध, आत्मनिर्भर भारत निर्माण होईल हा विश्वास युवा नेते शरण पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच भारतीय जनता पार्टी च्या सदस्यता नोंदणी ला गती येण्यासाठी “मतदार संघात सर्वत्र अभियानाच्या प्राचारा करिता व्हॅन चा शुभारंभ शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी,उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील, नाईकनगर सरपंच योगेश राठोड,रितेश जाधव,प्रविण गायकवाड, अप्पू गुंजोटे, राजूभाई मुल्ला,गौस शेख, सुजित शेळके तसेच मतदार संघातील भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top