तुळजापूर (प्रतिनिधी)- पुणे येथील यवतचे शिवाजी आखाडे या भाविकाने श्रीतुळजाभवानी चरणी अंदाजे 21 लाख किमतीचे 27 तोळे वजनाचे 4 सुवर्णहार अर्पण केले.

रोजच्या अलंकार पूजेसोबत या सुवर्णालंकारांनी श्रीतुळजाभवानी मातेचा शृंगार करण्यात आला. श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे त्यांचा साडी व देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर संस्थानच्या तहसिलदार तथा व्यवस्थापक माया माने, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव, लेखापाल तेजस कराडे, धार्मिक विभागाचे अमोल कर्डीले, आस्थापना विभागाचे आकाश गायकवाड व इतर मंदिर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top