तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीरातील ग्रेनाईड फरशी काढल्यानंतर देविभक्तांना याची देही याची डोळे मनभरून प्राचीन गाभाऱ्यातील मुळ पाहता येणार आहे. सध्या श्रीतुळजाभवानी मंदिराला पुरातन झळाळी व रुप आणण्यासाठी श्रीटोळ भैरव मंदीर, श्रीदत्त मंदीर, श्रीगोमुख तिर्थकुंड, श्रीगणेश ओवरीतील दर्शनी जुन्या दगडी भागावर नव्याने करण्यात आलेले बांधकाम काढुन जीर्णोध्दाराचे काम वेगात सुरू.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी लाभणार आहे. मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सध्या वेगात सुरू आहे.
हजारो वर्षांच्या अनमोल अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरासह मंदिर परिसरातील उपदेवतांच्या मंदिरांनाही प्राचीन गतवैभवाचे रूप मिळणार आहे. लवकरच राज्यासह देशभरातील देविभक्तांना तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा मूळ प्राचीन गाभारा याची देही याची डोळे मनभरून पाहता येणार आहे.