तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सांगवीमार्डी सारोळा-धनेगाव-मंगरुळ या नुकत्याच केलेल्या नऊ किलोमीटर रस्ताची वाट लागली असल्याने संबंधित अधिकारी ठेकेदार याचावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सोलापूर वरुन येणाऱ्या वाहने व प्रवाशांसाठी मंगरुळला जाण्यासाठी तुळजापूरहुन जावे लागत असे. हे अंतर जास्त होत या पार्श्वभूमीवर सोलापूर हुन येणारे वाहने, प्रवासी मधल्या मार्ग म्हणजे सांगवीमार्डी सारोळा-धनेगाव-मंगरुळला जाण्यासाठी सोयीचा व मधला मार्ग आहे. पण हा नऊ किलोमीटर रस्ता दोन ते तीन वर्षापुर्वी केला असुन, या रस्त्यावर जागोजाग खड्डे पडले आहेत. रस्त्यावरचे डांबर निघुन गेल्याने खडी उघडी पडली आहे. नऊ किलोमीटर रस्ता प्रवास करण्यासाठी पाऊन तास लागत आहे. मधला सोयीचा रस्ता असतानाही खराब रस्तामुळे वाहने तुळजापूर मार्ग मंगरुळ जात आहेत. यात इंधन जादा जात असुन अंतर वाढुन वेळ, पैसा खर्च होत आहे. हा रस्ता असुन अडथळा नसुन खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे याची चौकशी करुन दोषीअंती अभियंता, ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सदरील रस्ता वर कामाचा माहीती बाबतीत फलक दिसुन येत नाही.