तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील व्हानाळा ते वडगाव रस्त्यावर कारने शेळ्या चारणा-या इसमास उडवल्याने तो ठार झाल्याची घटना शनिवार दि. 4 जानेवारी रोजी दुपारी 01.वा घडली.
या बाबतीत अधिक माहीती अशी कि, शेतकरी पांडुरंग भागवत गायकवाड 22 रा. वडगाव लाख हा आपल्या शेळ्यांना घेऊन रानात चरण्यासाठी सोडुन तो रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली सावलीत बसला होता. अचानकपणे त्या रस्त्यावरुन येण़ाऱ्या कारने पांडुरंग भागवत गायकवाड वय वर्षे 22 याला त्या कारने इतक्या जोरात उडवले की यात पांडुरंग भागवत गायकवाड हा जागीच मृत्यु पावला. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी येऊन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असुन, अधिक तपास पोलीस करित आहेत.