धाराशिव (प्रतिनिधी) - येथील सुफी संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे यांच्या ७२० उर्स निमित्त शिवसेना (शिंदे) व डॉक्टर सेल महाराष्ट्र धाराशिव कार्यकारणी यांच्या संयुक्त विद्यमाने व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून मोफत सर्व रोग निदान आरोग्य महाशिबिराचे आयोजन दि.२५ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.
मोफत सर्व रोग निदान महाशिबिरामध्ये मोफत औषधे, डोळ्यांची तपासणी व मेतूबिंदू शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या मोफत रक्त तपासण्या, लहान मुलांच्या हृदयावरील मोफत शस्त्रक्रिया, अर्ध्या किमतीत सोनोग्राफी व एक्स-रे, २ डी ईको व ॲंजीओ ग्राफी, सर्व प्रकारच्या आजारावर उपचार, अल्प दरात चष्मे (गरजूंना मोफत) तसेच सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येईल. या शिबिरासाठी मेडिसीन तज्ञ डॉ धनंजय पडवळ, डॉ निहाल सय्यद, डॉ नौमान शेख, डॉ सादिक शेख, स्त्री रोग तज्ञ, डॉ परवीन पल्ला, डॉ अश्विनी धनंजय पडवळ-मुंडे, कान नाक घसा तज्ञ डॉ. व्यंकटेश पोलावार, किडनी तज्ञ डॉ दिनेश कात्रे, डॉ निलरोहित पैके, न्यूरो सर्जन डॉ नितीन बरडे, जनरल सर्जन डॉ अजित डिकले, अस्थिरोग तज्ञ डॉ कृष्णा स्वामी, डॉ अमोल बाराते, त्वचारोग तज्ञ डॉ आनंद चौधरी, नेत्र रोग तज्ञ डॉ महेश पाटील, डॉ मुस्तफा पल्ला, डॉ मोहमद सय्यद, बाल हृदय तज्ञ नितीन येळीकर, बालरोग तज्ञ डॉ आमिर खान, डॉ स्वप्निल भोसले, हृदय रोग तज्ञ डॉ सुनील शेवाळे, रेडिओलॉजी डॉ संग्राम मुंडे-पाटील, प्रियंका डिकले-मुंडे व मुळव्याध तज्ञ डॉ इर्शाद सय्यद आदी तज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांची तपासणी करणार आहे. हे महाआरोग्य शिबिर दर्गाह परिसरातील दारुल उलूम शमसिया गाजी मैदान येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या महाआरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने फुल ऍण्ड फायनल ग्रुप, एसीएम ग्रुप, गाजी स्पोर्ट्स क्लब, समता यंग ग्रुप, जीएम,ग्रुप, एमएस ग्रुप, गालिब ग्रुप, यांनी केले आहे.