परंडा ( प्रतिनिधी)- येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय येथील मराठी विभाग प्रमुख वरिष्ठ प्राध्यापक डॉ.हरिश्चंद्र मधुकर गायकवाड यांचे बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी परंडा येथील बावची चौक येथील स्मशानभूमी मध्ये करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ते मूळचे तालुक्यातील हिंगणगाव येथील रहिवासी होते. त्यांनी आपल्या कार्य कर्तुत्वाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर या विद्यापीठात एक वेगळा ठसा उमटविला होता.
या प्रसंगी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, अध्यक्ष सुनील शिंदे, महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच परंडा शहरातील व तालुक्यातील अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय चळवळीमध्ये काम करणारा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेच्या व शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयाच्यावतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी डॉ. भारत हंडीबाग, डॉ. सोळंकी, उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, स्टाफ सेक्रेटरी डॉ. शहाजी चंदनशिवे,कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.किरण देशमुख ,प्रा.डॉ प्रशांत गायकवाड प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पी एम शिंदे यांच्यासह कनिष्ठ वरिष्ठ विभातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.