तुळजापूर (प्रतिनिधी)- कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील रहिवाशी असणाऱ्या कला रायप्पा यांनी आज श्री. तुळजाभवानी देवीला सव्वा नऊ लाख रुपयांची रोख देणगी दिली. श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा व त्यांच्या कन्या रिशिका यांचा महावस्त्र व श्री. तुळजाभवानी देवीची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर, नागेश शितोळे, गणेश निर्वळ, अक्षय साळुंके, असिफ डांगे आदी उपस्थित होते.