ढोकी (प्रतिनिधी)- येडशी येथे दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी एक संक्रांत कुंकवापलीकडची हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रारंभी आई जगदंबेचे पुजन मनीषा ताई पाटील राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा धाराशिव, राजकन्या जावळे प्रहार संघटना जिल्हाध्यक्षा, रेखाताई गुंजकर _ कदम सुपरवायजर व आशा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा, छाया कांबळे ग्रामपंचायत सदस्य येडशी, संध्या दिवाने लिटल स्टार इंग्लिश स्कूल मुख्याध्यापिका येडशी, सीमाताई कदम आशा स्वयंसेविका यांच्या शुभ हस्ते हस्ते करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षा व सर्व प्रमुख पाहुणे तसेच मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष धाराशिव तथा दैनिक पुण्यनगरी पत्रकार सुरेश कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच येडशी गावचे ग्रामपंचायत सफाई कामगार यांचा पुष्पगुच्छ व पोशाख देऊन तर वयोवृद्ध महिलांना चोळी व फुलांचा गजरा देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये विधवा महिलांना विशेषता सुहासिनी महिलांनी हळदीकुंकू लावून तिळगुळ चारले व विधवा महिलांच्या केसात गजरा माळून विधवा महिलांचा सुहासिनी महिलांनी सन्मान केला यामुळे विधवा परंपरा मोडकळीस यावी यासाठी या येडशी गावच्या महिलांचा खास अट्टाहास आहे . पुरुषांची पत्नी निधन पावते तेव्हा तो पुरुष विधवा होत नाही ते पुरुष कार्यक्रमात पूजेला चालतात मग स्त्रीचे पती निधन पावल्यास ती कशी काय विधवा होते ? पती निधन पावलेली स्त्री का पूजेला चालत नाही ? हा प्रश्न येडशी गावच्या आशा स्वयंसेविका सीमाताई यांनी ग्रामस्थांना विचारला आहे. यावेळी विधवा परंपरावर सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता अहिल्याबाई होळकर इत्यादी वीर स्त्रियांनी सती जाणे परंपरा, केशव पण करण्याची परंपरा अतोनात प्रयत्नांनी मोडल्या तसेच येडशी गावच्या सीमाताई व त्यांच्या मैत्रिणींचे विधवा परंपरा मोडण्याचे ध्येय सार्थक व्हावे अश्या रेखाताई गुंजकर _ कदम यांनी दिल्या शुभेच्छा. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा सस्ते व अश्विनी पवार यांनी केले. कुंकूवापलीकडची संक्रांत हा कार्यक्रम सीमाताई यांनी आयोजित केला होता यावेळी मनीषा जगताप संगीता गोफणे, प्रियंका देशमुख, सविता गायकवाड ,शारदा लवटे, सुरेखा शिंदे, रत्नमाला शिंदे , अहमदाबी पटेल मनीषा शिंदे , गावातील मोठ्या संख्येने सुहासिनी महिला व विधवा महिला उपस्थित होत्या.


 
Top