तुळजापूर (प्रतिनिधी)- वक्तृत्व कलेमुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास निर्माण होतो. अशा स्पर्धेमुळे विद्यार्थी निर्भीड बनतात असे गौरवउद्गगार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काढले. ते श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्र महोत्सव 2025 निमित्त युवास्पंदन सामाजिक संस्था, तुळजापूर व मराठवाडा सामाजिक संस्था, तुळजापूर आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, स्पर्धा तुळजाभवानीची...वक्ता महाराष्ट्राचा या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत बोलत होते. 

या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून 307 शालेय स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यावेळी  जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ.धनंजय चाकूरकर, प्राचार्य  डॉ.जीवन पवार, गटशिक्षणाधिकारी मेहरुन्नीसा इनामदार, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, पंडितराव जगदाळे, जयश्री कंदले, अर्चना गंगणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सचिन , प्रा.डॉ. आनंद मुळे आनंद शिंदे बबन गावडे तुळजापूर तालुका पञकार संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास पोफळे  उपस्थित होते. स्वागताध्यक्ष अमर हंगरगेकर, युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे, मराठवाडा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण हंगरगेकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रशांत भागवत यांनी केले. तर आभार संदीप गंगणे यांनी मानले.

 
Top