परंडा (प्रतिनिधी) - येथील  शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथे स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.मराठी विभाग प्रमुख डॉ.हरिश्चंद्र गायकवाड, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाणे प्रा.शंकर कुटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. 

यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे,अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अरुण खर्डे. शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती सुनंदा कोटुळे, संतोष राऊत,भागवत दडमल, रामराजे जाधव, वसंत राऊत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले होते.

 
Top