परंडा (प्रतिनिधी) - राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त शहरातील मराठा सेवा संघ कार्यालय येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवार, शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख रणजित पाटील, तालुकाप्रमुख मेघराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस परंडा विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, उद्योजक काकासाहेब साळुंके, भाजपा माजी ता. अध्यक्ष राजकुमार पाटील, मराठा सेवा संघ माजी अध्यक्ष शशिकांत जाधव, आप्पा काशीद, बाळासाहेब पाटील, मलीक सय्यद, संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख, तालुका अध्यक्ष समाधान खुळे, अजिनाथ शेळके, अमोल गोडगे, नाना मांडवे,नागनाथ करळे, नाना मोरे, अमोल खैरे, दिलीप मोरजकर, नसीर शहाबर्फीवाले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, संजय कोळगे, अमर साळुंके, सुहास ठोंगे, लक्ष्मण गरड आदि उपस्थित होते.

 
Top