भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कळंब आगारात कार्यरत असणारे सहाय्यक वाहतूक अधिक्षक राकेश रोहिदास जानराव यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पीएचडी देवून सन्मानीत करण्यात आले आहे. राकेश जानराव हे पांगरी त़ा. बार्शी जि. सोलापूर येथील रहिवासी असून, सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सहाय्यक वाहतूक अधिक्षक म्हणून कळंब आगार धाराशिव या ठिकाणी कार्यरत आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 20 वा दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल तथा कुलपती सी.पी.राधाकृष्णन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू प्रा.डॉ. प्रकाश महानवर, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे कुलपती प्रा. जे. बी. जोशी या मान्यवराच्या हस्ते अर्थशास्त्र या विषयाची पीएचडी पदवी देवुन सन्मानीत करण्यात आले आहे.
राकेश जानराव यांनी अर्थशास्त्र विषयात रोल ऑफ इलेक्ट्रिसिटी इन एग्रीकल्चर डेव्हलपमेंट विथ रेफरन्स टु सोलापूर डिस्ट्रिक्ट यावर संशोधन कार्य वालचंद महाविद्यालय सोलापूर अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. संग्राम चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पुर्ण करून प्रबंध पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे सादर केला होता.
राकेश जानराव यांचे डॉ. गौतम कांबळे संचालक सामाजिक शास्त्र संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कोटी, डॉ. संतोष कदम (मंद्रुप), डॉ. पांडुरंग शिंदे (कुर्डुवाडी), प्रा.प्रमोद शहा (कुर्डुवाडी), प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे (परंडा), डॉ. दिपाली पाटील, प्रा.डॉ. मारूती लोंढे, विजय बांगर, विभाग नियंत्रक धाराशिव भालेराव, विभाग नियंत्रक लातूर अश्वजित जानराव, सुरक्षा व दक्षता अधिकारी श्रीधर नेहरकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.