कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालया मध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.संभाजी नगर यांचे आदेशानुसार महाविद्यालयांमध्ये “वाचन संकल्प महाराष्ट्राचा“ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी वाचन संस्कृती विकसित व्हावी या हेतूने महाविद्यालयांमध्ये वाचन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.तसेच दि.10 जानेवारी 2025 महाविद्यालयाच्या ग्रंथालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचणाची आवड निर्माण व्हावी म्हणून, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य.शशिकांत जाधवर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयातील ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ.विद्युलता पवार, मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.हनुमंत माने, हिंदी विभागाचे प्रमुख प्रा.शफीक चौधरी तसेच इंग्रजी विभाग व आयक्युएसी विभाग प्रमुख प्रा.डॉ.अनिल जगताप तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा.मनीषा कळसकर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थी वाचन संस्कृती पासून दूर जात असून मोबाईल मध्ये गुंग झालेले दिसून येते अशी खंत प्राचार्यांनी व्यक्त केली तसेच त्यांनी त्यांच्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन केले पाहिजे असे आवाहन प्राचार्य.शशिकांत जाधवर यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांनी सामूहिक पुस्तकाचे वाचन केले.सभागृहात यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.हनुमंत माने यांनी केले, सूत्रसंचलन प्रा. कळसकर मॅडम, आभार प्रदर्शन प्रा. डॉ. पवार मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. अमोल शिंगटे ,प्रा.बाबू पवार,प्रा. अमर खबाले प्रा.डॉ .गंभिरे उध्दव प्रा. कसबे प्रा. चोरघडे ,चौधरी सर, विनोद तुपारे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.