धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेटच्या सन 2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार कैलास पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी आमदार कैलास पाटील यांचा संस्थेच्या वतीने यथोचितरित्या सत्कार करण्यात आला.
संस्थेचे विद्यमान चेअरमन ॲड. चित्राव गोरे यांनी संस्थेबाबत माहिती देताना उस्मानाबाद जिल्हा बँक अडचणीत आल्यामुळे शेतकऱ्यांचे ऊस बिल वाटपासाठी संस्थेची स्थापना झाली. परंतु संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे सदर संस्था ही सेवा संस्था म्हणून चालविण्यास सांगितले. म्हणून या संस्थेचा 90% सभासद, खातेदार हा शेतकरी छोटे-छोटे व्यापारी यांना व्यवसाय कर्ज तर महिलांना सबळीकरणासाठी महिलांना बचत गटामार्फत कर्ज वाटप करून सर्वसामान्यांचे जीवनमान वाढविण्यास मोलाचा हातभार लावला जात आहे. संस्थेचे हे रोपटे कल्पवृक्ष झाले असून संस्थेने घेतलेल्या गरुड झेपेबाबत विवेचन केले.
यावेळी आमदार कैलास पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाची कौतुक करून संस्थेने महिलांना बचत गटामार्फत मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करावे जेणेकरून महिलांकडून कर्जाची वेळेत परत फेड होते. सदर कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक चेअरमन अरविंद गोरे, दिलीप पाठक, व्हाईस चेअरमन लईक शेख, वकील वर्ग, सभासद, हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. निलेश बारखेडे यांनी केले. शेवटी संस्थेचे संचालक शिवदास कांबळे व उपस्थित सभासद यांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याची जाहीर केले.