धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील गौरीनंदन गोशाळेचे अध्यक्ष गिरीश करपे यांना हिंदू धर्मरक्षक योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अखिल भारत हिंदू महासभा संत प्रकोष्ठद्वारा हा पुरस्कार श्री. करपे यांना प्रदान करण्यात आला.
धाराशिव येथे सकल संत सेवा समितीच्या वतीने जगदगुरू संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संत संमेलनामध्ये सुरू असलेल्या संगीतमय कथा सोहळ्यात हिंदू महासभा राष्ट्रीय अध्यक्ष (आयटी सेल) अजय सिन्हा व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हभप डॉ. ईश्वर गोरोबा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व आचार्य श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी रामानंद सरस्वती गुंजाळ बाबा* यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शक श्री गुरुवर्य ह.भ.प. भारत महाराज कोकाटे,गौरीनंदन गोशाळेचे अध्यक्ष श्री.गिरीश करपे, उपाध्यक्ष श्री मनोज अंजिरखाने, विश्व हिंदू परिषदेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष अॅड. गजानन चौगुले, अॅड. प्रवीण अत्रे, प्रा. श्यामराव दहिटणकर, हभप प्रा. दीपक खरात, श्री.सुरेश चंद्रकांत करपे व सौ .महानंदा सुरेश करपे, श्रीकृष्ण देशमुख, मेसा जानराव, राजाभाऊ जगताप, राजेंद्र लोहार, अॅड . प्रवीण अत्रे, बंडोपंत कुलकर्णी, श्री. दंडवते, श्री. बिराजदार, पुष्पाताई शिंदे, प्रा. सोमनाथ लांडगे, सदस्य संकेत सूर्यवंशी, अनंत वाघमारे, शिवलिंग गुळवे, राहुल काकडे, सुजित साळुंके, राज नवले, सलमान शेख, क्षितिज चव्हाण, बंडू देवकते, राज गुरव, मनोज गोरे, श्रीकांत दिवटे, प्रथमेश पेंढारकर, धीरज पतंगे, योगीराज मोरे आदींसह गोसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.