धाराशिव (प्रतिनिधी)-  राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी तेर येथे प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानात भाग घेतला.

भाजपा संघटन पर्व अंतर्गत सदस्यता नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने तेर येथे ग्रामस्थांशी संवाद साधत 88 00 00 2024 या क्रमांकांवर मिस्ड कॉल देऊन भाजपा परिवाराचे सदस्यत्व नोंदविण्याचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी आवाहन केले. तसेच काही नागरिकांच्या मोबाईलवरून मिस्ड कॉल देत त्यांना प्रक्रिया समजावून सांगितली व सदस्य करून घेतले. या अभियानात अनेक नागरिक, युवक, व्यापारी यांच्यासह माता भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गावात फिरत असताना जागोजागी सत्कार करून आम्ही देखील भाजपचे सदस्य झालो आहोत, असे अनेकांनी आवर्जून सांगितले.  

देशाची अर्थव्यवस्था गेल्या १० वर्षात सातत्याने प्रगतीच्या दिशेने जात असून नव नवीन विक्रम नोंदवले जात आहेत. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला, व्यापारी यांच्या हितासाठी आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याने अनेकांचे जीवन सुकर झाले आहे. त्यामुळेच आज अनेक जण भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना दिसत आहेत.

सशक्त व समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी भारतीय जनता पार्टी च्या पाठीशी खंबीरपणे राहावे व 88 00 00 2024 या क्रमांकांवर मिस्ड कॉल देऊन भाजपा परिवाराचे सदस्य व्हावे व इतरांना देखील या अभियानात सहभागी करून घ्यावे. असे आवाहन आ. पाटील यांनी केले आहे.

यावेळी जि.प.माजी उपाध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी, पद्माकर फंड, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, सरपंच दीदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, विठ्ठल लामतुरे, बबलू मोमीन, बालाजी पांढरे, अर्शद मुलाणी, भास्कर माळी, अजित कदम, गणेश फंड, मजीत मणियार, नवनाथ पसारे, किशोर काळे, अन्वर कोरबू, प्रवीण साळुंके, राम कोळी, संजय लोमटे, बीबी शिराळ, विलास रसाळ, युसूफ काझी यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. 


 
Top