धाराशिव (प्रतिनिधी)- प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा रुमापाता समूहाचे प्रमुख ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या 5 जानेवारी वाढदिवसानिमित समर्थ नगर धाराशिव व मौजे पाडोळी (आ) येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 51 रक्तदात्याचे रक्तदान केले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी यांची प्रमुख उपस्तिथ होते.
रक्तदान शिबीराचे उदघाटन व्यवस्थापकीय संचालक अजित गुंड, रुपामाता अर्बन मल्टीस्टेट संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले, रूपामाता मल्टीस्टेट संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर, प्रशाशकीय अधिकारी विशाल गुंड यांनी केले या प्रसंगी जनरल जनरल मॅनेजर डी.जे. शितोळे, बालाजी यादव, गुरुदत्त लोंढे, तुषार पाटील, महादेव डोंगरे, विकास मुळे, महादेव झोंबाडे, व्ही. एस. शिंदे, प्रसन्न देशमुख, श्रीनिवास गाजरे, विकास पेठे, आनंद गलांडे, सचिन सोमवंशी व गावकरी उपस्तीत होते या शिबीरामध्ये हर्षल मोहिते, राहुल यादव यांनी परिश्रम घेतले.