भूम (प्रतिनिधी)- येथील शंकरराव पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनाचे शिबीर मौजै वालवड येथे आयोजित करण्यात आले असुन आज दि ( 4 जानेवारी) या दिवशी गणित विभागाचे प्रमुख प्रा. गजानन कारळे यांनी माहीत तंत्रज्ञान साक्षरता या विषयावर व्याख्यान झाले. विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात अनेक नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत . तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तची  माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या व्याख्यानाला  विद्या विकास मंडळाचे कोषाध्यक्ष श्री अतुल सुरवसे सर अध्यक्ष स्थानी होते. 

या व्याखानमालेचे आयोजन राष्ट्रीय सेवाप योजना विभागाचे प्रमुख डॉ नितीन पडवळ, प्रा दिप्ती गीरी प्रा. गंगाधर काळे यांनी केले. या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा इनामदार जी. एच. , प्रा तानाजी बोराडे, प्रा डॉ गव्हाणे के.जी. प्रा. तिजारे गौतम प्रा डॉ दुनघव प्रा राहुल राठोड प्रा. डॉ श्यामसुदंर आगे प्रा सौ अलगूंडे एस. एम . प्रा सोळंके आर. डी प्रा.  सुर्यवंशी महेश  प्रा सोहम गायकवाड प्रा माळी बी एम प्रा. नाईक यु बी. या सह शिक्षकेत्तर कर्मचारी व  महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थिती होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गंगाधर काळे यांनी केले तर आभार विद्यार्थीनी सानिया पठाण हिने केले.


 
Top