धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 31 वा नामविस्तार दिन विद्यापीठ उपपरिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. डॉ. दिगंबर नेटके, निवृत्त संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, प्रमुख अतिथी म्हणुन कार्यक्रमास उपस्थित होते. राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य देविदास पाठक यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती.  विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित कार्यक्रमास अध्यक्षस्थान भूषविले. विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ. विक्रम शिंदे इ. व्यासपीठावर उपस्थित होते. 

राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य, देविदास पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी डॉ. दिगंबर नेटके, निवृत्त संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी विशेष व्याख्यानातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप विद्यापीठ उपपरिसराचे संचालक, प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 31 वा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक  डॉ. विक्रम शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. जितेंद्र शिंदे यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. विद्यापीठ उपपरिसरातील विभागातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

 
Top