उमरगा (प्रतिनिधी)- ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उमरगा, ग्रामऊर्जा फाउंडेशन, अंबाजोगाई, युथएड फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्ह्यात प्रथमच उमरगा येथे उद्योजकता एस समिट 2025 व मकर संक्रातीनिमीत्त महिलांसाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.11 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2 दिवस हा कार्यक्रम श्रीराम मंगल कार्यालय, उमरगा येथे संपन्न होणार आहे.
यामध्ये उद्योजकांना आपली उद्योग विषयक कल्पना सादर करण्यासाठी व्यासपीठ, गुंतवणूकदार, मार्गदर्शक आणि प्रमुख व्यक्तीशी ओळख, राष्ट्रीय एस समिट बेंगलोर येथे जाण्याची संधी. आपल्या उद्योगासाठी पैसे/भांडवल मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्यास विजेते प्रमाणपत्र, उद्योजक प्रशिक्षण संदर्भात 7 दिवसीय बुटकॅम्प, व्यवसाय विकासासाठी लागणारे मार्गदर्शन, राष्ट्रीय एस समिट मध्ये थेट प्रवेश, जिल्हास्तरीय व्यवसायिक मार्गदर्शकांशी ओळख आदी लाभ मिळणार आहेत. या स्पर्धेसाठी वय 18 ते 45 वर्ष वयोगटातील स्त्री-पुरुष, नवीन आणि नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना असलेले नवउद्योजक व बचत गटाच्या माध्यमातुन घरगुती उद्योग चालविणाऱ्या महिला सहभागी होऊ शकतात. उमरगा व लोहारा तालुक्यातील नवउद्योजक व महिलांनी यात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा ज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा ॲड.आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे.