परंडा (प्रतिनिधी)- परंडा - रोहकल मुकामी असलेली (बस क्र.एम एच 20 बी एल) ही एस टी बस सकाळी सात वाजता रोहकल, कंडारी,सोनारी येथून परंडा येथे 18 प्रवासी घेऊन निघाली असता सोनारी - परंडा महामार्गावरिल हरणवडा येथे सकाळी 8 वाजताच्या दरम्यान आली. अचानक स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने ड्रायव्हरचा गाडी वरचा ताबा सुटल्याने एका झाडाला जोरदार आदळून भिषण आपघात झाला. यात एकजण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी तर पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.

हा अपघात परंडा तालुक्यातील सोनारी गावाजवळ हरणवडा येथे सोमवार दि.27 जानेवारी रोजी अपघाताची घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच सोनारी,कंडारी येथील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. जागीच मृत झालेल्या करमाळा तालुक्यातील पारेवाडी येथील तात्या वीरभद्र पाटणे (वय 59) व जखमीं बसचालक दत्तू तौर अनपूरे व शालेय विद्यार्थी यांना बस मधून काढून पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय  परंडा येथे दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना वैद्यकीय अधिकारी डॉ.अबरार पठाण, डॉ. मुस्तकील पठाण, डॉ.राजेंद्र रेवडकर यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बार्शी व धाराशिव येथे पाठविण्यात आले आहे.


 
Top