भूम (प्रतिनिधी)-  परांडा-भूम-वाशी तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्या फिरत आहे. या बिबट्याकडून शेतक-यांच्या पशुधनाची हानी झालेली आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वीज रात्रीच्या ऐवजी दिवसा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. माजी आमदार राहुल मोटे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधत, भूम उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

परांडा-भूम-वाशी तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. या बिबटयाकडून शेतक-यांच्या पशुधनाची हानी झालेली आहे. बिबटयाचा व आदर्श प्राणी यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात याविषयी मी यापुर्वी निवेदन दिले होते. परंतु अद्यापपर्यंत बिबटयाचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे ब-याच ठिकाणी शेतीसाठी रात्रीची लाईट असल्यामुळे आणि सध्या ज्वारी, गहू, हरभरा, ऊस या पिकाला पाणी देण्याचे दिवस असल्यामुळे शेतक-यांना रात्री अपरात्री त्यांचे पिकास पाणी देण्यासाठी न इलाजाने शेतात जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या परांडा-भूम-वाशी तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे बिबट्यापासून शेतक-याच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता आहे. तरी भूम-परांडा-वाशी या तालुक्यातील रात्रीच्या लाईटच्या वेळा बंद करून सर्व शेतकरी यांना सरसकट दिवसा लाईट देण्यात यावी. जेणेकरून शेतक-याच्या जिवीतास धोका निर्माण होणार नाही. राहुल मोटे यांनी शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी.दिवसा वीज उपलब्ध झाल्यास शेतीसाठी पाणीपुरवठा, सिंचन आणि अन्य कामे सुरळीत पार पडू शकतील, असेही त्यांनी नमूद केले. त्यांना अधिक सुलभ पद्धतीने शेती करता यावी, यासाठी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, असे आवाहन केले. आणि जर शेतीसाठी रात्रीची लाईट ठेवल्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाल्यास यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.

 
Top