धाराशिव (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कौशल्य विकसित व्हावी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची एक आहे समाजाभिमुख वैज्ञानिक उपकरणे तयार करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागावा. या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या धाराशिव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात धाराशिव येथील आर्य चाणक्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावून नैपुण्य प्राप्त केले आहे.

दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक शारुख तांबोळी, अजिंक्य लोंढे यांनी तयार केलेल्या आधुनिक होम या उपकरणाला मिळाले. यासाठी त्यांना प्रशालेच्या शिक्षिका नूतन नागपुरे, मोनालिका पवार यांचे  मार्गदर्शन लाभले. तर तिसरा क्रमांक प्रणव साळुंके, अथर्व वाघोलीकर यांनी तयार केलेल्या रोबोटिक फवारणी यंत्र या उपकरणाला मिळाला. विद्यार्थ्यांच्या या कौशल्याबद्दल लोकसेवा समितीचे अध्यक्ष एड. मिलिंद पाटील, शेषाद्री डांगे, डॉ. अभय शहापूरकर, कमलाकर पाटील, मुख्याध्यापक डॉ मनीष देशपांडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे बाबासाहेब जगताप, शिंदे मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले.

 
Top