धाराशिव (प्रतिनिधी)-  मोठ्या माणसांच्या मेंदूचा विकास होतो. त्यामुळे मोठ्या माणसांना जसे हवे तसे बालकांनीही करावे असे प्रत्येक पालकांना वाटते. मात्र बालकांच्या भावनिकतेचा विचार करणारे शिक्षण त्यांना देणे गरजेचे आहे. त्यासाठी काय शिकायचे यापेक्षा शिकायचे कसे ? हे आजच्या बालकांना शिकविणे अत्यंत गरजेचे व महत्वाचे असल्याचे प्रतिपादन तज्ञ मार्गदर्शक प्रवीण गुरव यांनी दि.17 डिसेंबर रोजी केले.

धाराशिव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) मध्ये कैवल्य एज्युकेशन फाउंडेशन, पिरामल फाउंडेशन व जिल्हा शिक्षण विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्षमता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी धाराशिवच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी सविता देशमुख, ताई बोराडे (कळंब), यु.बी. भारती (वाशी), पर्यवेक्षिका इंदुमती राठोड, शितल गाढवे, फाउंडेशनचे व्यवस्थापक दिनेश शिमणीकर, श्रुती कापरे, धनश्री खडसे आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना गुरव म्हणाले की, अंगणवाडी सेविकांना अशा प्रशिक्षणामध्ये माणसांचा मेंदू इतका प्रकल्भ का झाला, बुद्धिपदा म्हणजे काय, बुद्धिमत्तेचे प्रकार किती व कोणते ? हे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कारण शून्य ते सहा वयोगटातील बालकांना लहानपणापासून मनो सामाजिक विकास कसा घडवून आणला पाहिजे ? यासाठी त्या बालकांच्या मातांना अंगणवाडीमध्ये पालकांची बैठक घेऊन त्या सविस्तरपणे समजावून सांगू शकतात असे त्यांनी सांगितले. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील 150 अंगणवाडी सेविका, बाल विकास प्रकल्प अधिकारी, कर्मचारी, तसेच फाउंडेशनचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top